सध्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यात तो इडली विकून लाखोंची कमाई करत असल्याचं म्हटलं जातंय.
सध्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे लोक नवे नवे स्टार्टअप्स घेऊन समोर येत आहेत.
अनेक जण कमी गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात पैसाही कमावत आहेत.
काही जण सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून पैसा कमावतायत, तर काही जण युट्यूबवर व्लॉग करून पैसे कमावताहेत.
यादरम्यान, आंध्रातून एक बातमी समोर आलीये. इकडे एक तरुण इडली विकून लाखोंची कमाई करतोय.
चिट्टेम सुधीर असं त्याचं नाव असून त्यानं अग्रीकल्चर इकॉनॉमिक्स मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. तो इडली विकून महिन्याला ७,५ लाख रुपयांची कमाई करतोय.
व्हायरल पोस्टनुसार त्यानं ५० हजार रुपयांत हे काम सुरू केलं होतं. परंतु आता त्याची लाखोंत कमाई आहे.