आपण कितीही हेल्दी राहण्याचा आणि पौष्टिक अन्न खाण्याचा प्रयत्न केला तरीही ऑफिसमध्ये काही खाण्याच्या चुकांमुळेच आपले वजन नियंत्रणात राहत नाही...
सकाळच्या ऑफिसच्या धावपळीत नाश्ता स्किप करुन दुपारच्या जेवणाच्या वेळी एकाच वेळी भरपूर पोट भरून खाल्ल्याने आपले वजन वाढू शकते.
ऑफिसमध्ये तासंतास कामानिमित्त एकाच ठिकाणी बसून राहिल्याने, तसेच कामामध्ये ब्रेक न घेता खूप वेळ एकाच जागी बसल्याने वजन लगेच वाढू शकते.
ऑफिसमध्ये असताना दुपारच्या जेवणात हेल्दी व पोषक आहार घ्यावा, अति तेलकट, मसालेदार आणि जंक फूड खाणे टाळावे. यामुळे देखील आपले वजन नियंत्रणात न राहाता वाढू शकते.
भूक लागल्यावर देखील कामाच्या गडबडीत किंवा काम पूर्ण करण्याच्या प्रेशरमध्ये जेवण वेळेवर न जेवणे हे देखील वजन वाढीचे मुख्य कारण असू शकते.
सध्याच्या काळात आपल्याला शिफ्ट्स मध्ये काम करावे लागते, नाईट शिफ्टमध्ये काम करत असताना आपल्या शरीरातील कॅलरीज बंर्न होत नाहीत यामुळे वजन वाढून आपल्याला अनेक आजार होण्याचा धोका संभवतो.
ऑफिसमध्ये असताना आपण कामाच्या गडबडीत पाणी पिणेच विसरतो, यामुळे शरीरातील टॉक्सिन्स वाढून शरीरात फॅट्स तयार होण्यास सुरुवात होते.
ऑफिसच्या कामाच्या गडबडीत आपण काहीवेळा जेवण अगदी घाईघाईत संपूर्णपणे न चावता खातो त्यामुळे अन्नाचे नीट पचन होत नाही, यामुळे पाचन बिघडून देखील वजन वाढू शकते.
जर आपण ऑफिसच्या कामाचा स्ट्रेस घेऊन वेळेवर आणि योग्य पद्धतीने जेवण केले नाही, हे देखील आपल्या वजन वाढीचे मुख्य कारण ठरु शकते.
दररोज ऑफिसमध्ये घरगुती आहार न घेता सारखेच बाहेरचे तळलेले, मसालेदार, जंक फूड खाणे हे देखील वजन वाढीचे मुख्य कारण ठरू शकते.
ऑफिसचे काम करता करता सतत थोड्या वेळाने पॅकिंग केले फूड जसे की, चिप्स, बिस्किट्स, चॉकलेट्स खाणे टाळावे, यामुळे देखील वजन वाढू शकते.