आपण महागामोलाचं आणून खातो आणि त्याच पदार्थात भेसळ असेल तर जीवावर बेतू शकतो, भेसळ ओळखण्याचे हे उपाय...
चीज स्लाईस जर जळून गळू लागलं तर ते शुद्ध आहे. गळण्याऐवजी ते जर काळं पडलं तर त्यात भेसळ आहे असे समजावे.
अस्सल केशर सहज तुटत नाही. याउलट आर्टिफीशियल केशर सहज तुटते. तसेच अस्सल केशर पूर्ण विरघळेपर्यंत रंग देत राहतो.
एका ग्लासात एक चमचा धणे पूड टाकून हलवावे. जर भेसळयुक्त भूसा असेल तर तो पाण्यावर तरंगू लागतो.
एक ग्लास पाण्यात काळी मिरी पाणी घालावी जर काळीमिरी पाण्यावर तरंगली तर अशुद्ध आणि बुडून गेली तर शुद्ध आहे असे समजावे.
मटार हिरवेगार दिसण्यासाठी यात मेलाकाइट ग्रीन मिसळतात. मटाराचे दाणे काही वेळासाठी पाण्यात ठेवा. पाणी हिरवं झाल्यास समजून जा यात भेसळ आहे.
गुळगुळीत फरशीवर दुधाचे काही थेंब टाका. जर थेंब चिन्ह न सोडता त्वरित पुढे वाहिले तर यात पाणी मिसळलेले आहे. जर दूध शुद्ध असेल तर ते हळू हळू खाली घसरेल आणि पांढरे डाग सोडेल.
खव्यात थोडी साखर टाकून हे मिश्रण उकळवा. जर मिश्रण पाणी सोडू लागले तर तो खावा भेसळयुक्त आहे.
फळं फ्रेश दिसण्यासाठी त्यावर व्हॅक्स लावलं जातं. हे ओळखण्यासाठी फळं गरम पाण्यात टाका. त्यांना लावलेलं व्हॅक्स निघून जाईल.
एक ग्लास पाणी घ्यात त्यात एक चमचा कॉफी घाला. जर पाण्याचा रंग बदलत नसेल तर ती कॉफी भेसळयुक्त आहे असे समजावे. कारण शुद्ध कॉफीने लगेच पाण्याचा रंग बदलतो.
तांदळात प्लास्टिकच्या दाण्यांची भेसळ केली जाते. एका गरम भांड्यात कच्चे तांदूळ घ्या. जे तांदूळ प्लास्टिकचे असतील ते वितळतील.