Tap to Read ➤
४ गोल, गोल्डन बूट! मेस्सीची धाकधुक वाढवणार एमबाप्पे आहे तरी कोण?
अर्जेंटिनाने ३६ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकला. गतविजेत्या फ्रान्सला त्यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले
१२० मिनिटांच्या खेळात ३-३ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने ४-२ ने बाजी मारली.
लिओनेस मेस्सी अन् त्याच्या स्वप्नांच्या मध्ये एक खेळाडू उभा राहिला, तो म्हणजे फ्रान्सचा २३ वर्षीय कायलिन एमबाप्पे
०-२ आणि २-३ असा फ्रान्सचा संघ दोन वेळा पिछाडीवर फेकला गेला, परंतु एमबाप्पेने दोन्ही वेळा कमबॅक करून दिले.
रोनाल्डो, मेस्सी या दिग्गजांनंतर आता भविष्यातील स्टार म्हणून कायलिन एमबाप्पेने स्वतःला सिद्ध केले आहे.
फ्रान्सचा हा युवा खेळाडू उद्या २४व्या वर्षी पदार्पण करणार आहे, परंतु वर्ल्ड कप विजयाची भेट त्याला मिळवता आली नाही
एमबाप्पे लहानाचा मोठा बाँडी या शहरानजीक झाला. सहा वर्षांचा होता तेव्हा फ्रान्सने १९९८मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता
राहत्या घरापासून स्टेडियम अगदी ११ किलोमीटरवर होते. त्याचे वडिल हे मुळचे कॅमेरूनचे, पण ते फुटबॉल कोच होते
भाऊ एथन हाही पॅरिस सेंट-जर्मेन क्लबच्या १२ वर्षांखालील संघातून खेळायचा अन् एमबाप्पेला फुटबॉलची ओढ लागली
झिनेदिन झिदान, रोनाल्डो नाझारियो आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला आदर्श मानणाऱ्या एमबाप्पेने काल कमाल केली.
१८व्या वर्षी एमबाप्पेला पॅरिस सेंट-जर्मेनने १८० मिलियन युरोमध्ये करारबद्ध केले आणि तो दुसरा महागडा खेळाडू ठरला
लहानपणी उशी म्हणून तो फुटबॉल घेऊनच झोपायचा. कायलिन एमबाप्पेकडे भविष्यातील सुपरस्टार म्हणून पाहिले जातेय.
वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात फायनलमध्ये हॅटट्रिक करणारा एमबाप्पे दुसरा खेळाडू . इंग्लंडच्या जॉफ हर्स्ट ( १९६६) यांनी जर्मनीविरुद्ध हा पराक्रम केला होता.
२३ वर्ष व ३६३ दिवसांच्या एमबाप्पेचा हा यंदाच्या वर्ल्ड कपमधील सातवा आणि एकंदर दहावा गोल ठरला
वर्ल्ड कप इतिहासात १० गोल करणारा तो युवा खेळाडू ठरला. त्याने गेर्ड मुलरचा ( २४ वर्ष व २२६ दिवस ) विक्रम मोडला.
क्लिक करा