Tap to Read ➤

भुवया विरळ आहेत? ४ टिप्स- आयब्रोज होतील काळ्याभोर- दाट

काही जणींच्या भुवया खूपच विरळ असतात. तसेच भुवयांचे केसही छान काळेभोर नसतात. त्यामुळे चेहऱ्याला छान रेखीवपणा येत नाही.
तुमच्याही भुवया अशाच असतील तर भुवया छान काळ्याभोर, दाट करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा...
वारंवार प्लकिंग करणं टाळा. १- २ महिन्यांचा गॅप घ्या, भुवया चांगल्या वाढू द्या आणि त्यानंतर फक्त जास्तीचे वाढलेले केस काढून त्यांना छान आकार द्या.
भुवयांसाठी बाजारात खास सेरम मिळतात. त्यात पेप्टाईड आणि बायोटिन हे दोन घटक असलेले सेरम घ्या. भुवयांची चांगली वाढ होईल.
कॅस्टर ऑईल लावून भुवयांची नियमितपणे मसाज करा. यामुळेही केस काळेभोर, दाट होण्यास मदत होईल.
भुवयांची चांगली वाढ होऊन त्या काळ्याभोर, दाट हाेण्यासाठी थोडा वेळ लागतोच. त्यामुळे थोडा संयम ठेवा.
क्लिक करा