वजन कमी करायचं असेल तर दररोज सकाळी नाश्त्यामध्ये हे काही पदार्थ नियमितपणे तुम्ही खायलाच पाहिजेत. हे पदार्थ नेमके कोणते ते पाहूया...
यातला सगळ्यात पहिला पदार्थ आहे भिजवलेले बदाम. त्यामध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्यातून मिळणारी उर्जा अधिककाळ टिकते.
सलाड, सॅण्डविज, पराठा अशा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नाश्त्यामध्ये पनीर घेतलं तर पोट अधिककाळ भरलेले वाटते. त्यामुळे इतर काही खाण्याची इच्छा होत नाही.
हरबऱ्यांमध्ये फायबर आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असल्याने ते देखील वेटलॉससाठी मदत करतात.
ब्रोकोलीमध्ये carotenes हा पदार्थ असताे. तो फॅटबर्न होण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने मदत करताे.
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रोटीन्स, फायबर तर असतातच. पण त्यांच्यामुळे चयापचय क्रिया अधिक वेगवान होते, त्यामुळे वजन कमी होण्यास फायदा होताे.