म्हातारपणीही एकदम फिट रहाल, फक्त 'या' ५ सवयी लावून घ्या
फिटनेस आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टी वयाच्या चाळिशी- पन्नाशीनंतरही कायम राहाव्या असं वाटत असेल तर या ५ सवयी स्वत:ला लावून घ्या...
फिट राहायचं असेल तर फिजिकली ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे योगा, ॲरोबिक्स, झुंबा, वॉकिंग, सायकलिंग असा तुम्हाला आवडेल तो व्यायाम नियमितपणे करा.
भाज्या, फळं आणि प्रोटिनयुक्त पदार्थ तुमच्या आहारात जास्तीतजास्त असावेत. तसेच शुगर आणि पॅक फूड सुरुवातीपासूनच कमी खा.
रात्रीची जागरणं टाळा. दररोज रात्री ७ ते ८ तासांची झोप मिळायलाच पाहिजे.
लहानसहान गोष्टींचा त्रास करून घेणं, चिडचिड करणं, ताण घेणं टाळा. ताण आलाच तर मेडिटेशन, प्राणायाम करण्याची सवय लावा.
नेहमी पॉझिटीव्ह राहण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचारसरणी असणाऱ्या लोकांनाही तुमच्यापासून दूर ठेवा.