Tap to Read ➤
चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स घालविणारे ५ नॅचरल स्क्रब
चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स आले असतील तर इतर कोणतेही केमिकल्स लावण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करून पाहा.
हे उपाय केल्याने पिंपल्स, ॲक्ने यांचे डाग, डार्क स्पॉट्स कमी होतील तसेच चेहऱ्यावर छान ग्लो येईल.
१ टेबलस्पून ओटमील घ्या. त्यात कच्चं दूध टाकून त्याची पेस्ट तयार करा. या लेपाने चेहऱ्याला मालिश करा. चेहरा चमकदार होईल.
दही आणि हळद यांची पेस्ट तयार करा आणि त्याने चेहऱ्याला मसाज करा. चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स कमी होऊन टॅनिंग निघून जाण्यास मदत होईल.
मध आणि साखर एकत्र करून चेहऱ्याला स्क्रबिंग केल्यास त्वचेवर खूप चांगले परिणाम दिसून येतात.
कॉफी पावडर आणि तूप किंवा कॉफी पावडर आणि खोबरेल तेल एकत्र करून चेहऱ्याला मालिश करा. हिवाळ्यासाठी तर हा उपाय अगदी उत्तम आहे.
टोमॅटोची प्युरी आणि साखर एकत्र करून चेहऱ्याला स्क्रब केल्यास पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट्स कमी होतील.
क्लिक करा