वजन कमी करण्यासाठी ओवा खाणं खूप फायदेशीर ठरतं. पण त्यासाठी नेमक्या काेणत्या पद्धतीने ओवा खावा ते आता पाहूया....
१ ग्लास पाणी घ्या. त्यात १ टीस्पून ओवा टाका. हे पाणी ५ ते ७ मिनिटे चांगले उकळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. पचनक्रिया चांगली सुधारते.
२. १ टी स्पून ओवा आणि १ टीस्पून मध हे मिश्रण एकत्र करा आणि दररोज सकाळी नाश्ता करण्याच्या अर्धातास आधी घ्या. चयापचय क्रिया चांगली होते.
३. १ टीस्पून ओवा १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गरम करा. त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस टाका आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. बॉडी डिटॉक्स होते.
४. १ टीस्पून ओवा १ कप पाण्यात उकळून घ्या. त्यात तुम्ही लिंबू किंवा मध टाकू शकता. दुपारी चहाच्या ऐवजी हाच ओव्याचा चहा प्या..
५. १ टीस्पून ओवा आणि १ टीस्पून बडिशेप १ कप पाण्यात टाकून उकळवा. हे उकळलेले पाणी कोमट झाल्यानंतर प्या. वजन कमी होईल.