Tap to Read ➤

परफेक्ट मऊमोकळे पोहे करण्याच्या ८ स्टेप्स - SAKHI

पोहे बनवणे सोपे वाटत असले तरी, पोहे भिजवणे अवघड काम आहे. पोहे जर मऊ मोकले झाले नाही तर, खाण्याची मज्जाच निघून जाते. काहींचे पोहे फसतात, त्यांचा गचका होतो.
भारतात पोह्याची ओळख एक फेमस नाश्त्याचा पदार्थ म्हणून आहे. प्रत्येक घरात पोहे बनतात. मात्र, परफेक्ट पोहे बनवताना काहीतरी गडबड ही होतेच.
पोहे मोकळे बनवण्यासाठी सर्वप्रथम, स्टीलची चाळण घ्या. त्या चाळणीत पोहे घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्या व अतिरिक्त पाणी काढा.
आता दुसरीकडे पोह्यासाठी लागणारं साहित्य चिरून घ्या. व कढईत तेल गरम करत ठेवा.
तेल गरम झाल्यानंतर त्यात शेंगदाणे तळून घ्या. शेंगदाणे जास्त खरपूस तळू नये. यामुळे शेंगदाणे चवीला कडू लागतात.
तळेलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्याच तेलात मोहरी, कढी पत्ता, हिरवी मिरची, कांदे, बटाटे, मीठ आणि हळद टाका.
शेवटी टॉमेटो टाका, हवे असल्यास आपण लाल तिखट देखील वापरू शकता. आता हे संपूर्ण मिश्रण चांगले मिक्स करा.
आता भिजवलेले पोहे चांगले सुटसुटीत झाले असतील, त्यांना हाताच्या मदतीने आणखी मोकळे करा. आणि फोडणीत टाकून मिक्स करा.
शेवटी चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, आणि शेव टाकून गरमागरम सर्व्ह करा.
क्लिक करा