कमी वयात केस पांढरे होऊ नयेत यासाठी त्यांना योग्य पोषण मिळणं गरजेचं असतं. म्हणूनच केसांसाठी सुपरफूड ठरणारे हे ७ पदार्थ नियमित खा आणि पांढऱ्या केसांचं टेन्शन विसरा.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ते शरीरात मेलॅनीन तयार करण्यासाठी आवळा खूप उपयुक्त ठरतो.
बदामामध्ये असणारे व्हिटॅमिन ई आणि फॅटी ॲसिड केसांसाठी अतिशय पोषक आहे.
ब्लॅक टीमध्ये असणारे फ्लेवोनाईड्स केसांचा काळा रंग पक्का ठेवण्यासाठी मदत करतात.
ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर असणारा कडिपत्ता खाल्ल्यास केसांची चांगली वाढ होते आणि केस काळे राहतात
कांद्यामध्ये असणारे सल्फर मेलॅनीन निर्मिती करण्यास फायदेशीर ठरतात.
दोडक्यामध्ये असणारे अनेक घटकही केसांसाठी खूपच उपयुक्त असतात.
डाळींमध्ये प्रोटीन्स- व्हिटॅमिन्स भरपूर असतात. त्यामुळे दररोज १ वाटी वरण खायलाच पाहिजे.