Tap to Read ➤
हृदयासाठी घातक ठरतात ८ गोष्टी, लक्ष द्या नाहीतर..
हृदयाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी..
हृदयविकाराचा झटका येणे आता सामान्य झाल्याने जीवनशैली चांगली असेल तर हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले वजन हे हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
धूम्रपान मद्यपानासारखे व्यसनही हृदयाच्या कार्यात अडथळा आणण्यास कारणीभूत ठरते.
जंक फूड, आहाराच्या चुकीच्या पद्धतींमुळे शरीराचे पोषण न झाल्याने हृदयाच्या कार्यावर त्याचा परीणाम होतो.
पोटाची चरबी वाढलेली असेल तर उच्च रक्तदाब आणि त्यामुळे हृदयरोग उद्भवतो.
सतत बैठे काम आणि व्यायामाचा अभाव यांमुळेही हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
रक्तदाबाच्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि हृदयविकार होतो.
कमी झोप हेही हृदयाचे कार्य बिघडण्याचे एक महत्त्वाचे कारण असते.
घोरणे ही एक गंभीर समस्या असून यामध्ये झोपेत श्वास काही सेकंदांसाठी थांबतो. जे हृदयासाठी घातक असते.