Tap to Read ➤
कपाळी चंद्रकोर अन् नाकात नथ; मधुराणीचा पारंपरिक लूक
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने प्रचंड लोकप्रियता मिळवली.
उत्तम अभिनय आणि स्वभावातील साधेपणा यामुळे ती कायमच नेटकऱ्यांचं मन जिंकत असते.
मधुराणीचा सोशल मीडियावरही वावर आहे. त्यामाध्यमातून ती अनेकदा चाहत्यांच्या भेटीला येते.
नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो समोर आले आहेत.
दिवाळीनिमित्त अभिनेत्रीने पारंपरिक अंदाजात फोटोशूट केलं आहे.
गुलाबी साडी त्यावर साजेसे दागिने अशा लूकमध्ये मधुराणी खूपच सुंदर दिसते आहे.
फोटोंमध्ये कपाळी चंद्रकोर, नाकात नथ असा तिचा अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडलाय.
"Happy Diwali to Everyone!" असं कॅप्शन देत अभिनेत्रीने चाहत्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
क्लिक करा