अनन्या बिर्ला ही आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे.
अनन्या यांनी गायिका आणि संगीतकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
पण, नंतर वडिलांच्या सांगण्यावरुन त्यांनी कौटुंबिक व्यवसाय सांभाळण्याचा निर्णय घेतला.
अनन्या यांनी मायक्रोफायनान्स नावाची कंपनी स्थापन केली. जी महिलांसाठी काम करते.
या कंपनीच्या देशातील ४ राज्यांमध्ये ७० हून अधिक शाखा आहेत.
यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट स्टार्टअपचा पुरस्कारही मिळाला आहे.
आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलच्या बोर्डावर त्यांना संचालक म्हणून नियुक्त केलं आहे.
अनन्या ई-कॉमर्स कंपनी क्यूरोकार्टची संस्थापक आणि सीईओ असून नेटवर्थ १ लाख कोटी रुपये आहे.
मुंबईतील उच्चभ्रू मलबार हिल परिसरात समुद्रासमोर बिर्ला कुटुंबाची एक हवेली आहे.
२०१८ मध्ये ४२५ कोटी रुपयांना याची खरेदी झाली होती.