Tap to Read ➤

रिटर्न फाईल करताय या छाेट्या चुका टाळा? अन्यथा मोठा भुर्दंड बसेल

२०२३-२४ साठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२४ पर्यंत आहे
आयटीआर दाखल करताना अनेकदा लोक छोट्या-छोट्या चुका करतात, अशा चुकांचा मोठा भुर्दंड बसू शकतो.
आयटीआर फॉर्म भरताना सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरा. चुकीची माहिती भरल्यास आयटीआर अस्वीकृत होऊ शकते.
उत्पन्नाचा स्रोत आणि प्रकार यानुसार आयटीआर अर्ज वेगवेगळे आहेत. चुकीचा अर्ज निवडल्यास आयटीआर अस्वीकृत होऊ शकते.
वेतन, भाडे, भांडवली लाभ आणि व्याज आदी सर्व स्रोतांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती देणे आवश्यक आहे. न दिल्यास तुम्हाला दंड लागू शकतो. चौकशीही होऊ शकते.
चुकीची वजावट, सूट वजावट आणि सूट याबाबतची चुकीची माहिती भरल्यास रिफंड कमी होऊ शकतो. कर वाढण्याचाही धोका असतो. त्यामुळे यात योग्य काळजी घेण्याची गरज आहे.
ऑनलाइन आयटीआर फाइल केल्यानंतर ते पडताळून (व्हेरिफाय) घेणे आवश्यक असते. पडताळणीअभावी आयटीआर अमान्य होते.
व्यक्तिगत करदात्यांसाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख साधारणत: ३१ जुलै असते.
वेळेत आयटीआर न भरल्यास १ हजार ते १० हजार रुपयांचे विलंब शुल्क लागू शकते. तसेच करदात्यास वजावट व सूट यापासून वंचित राहावे लागू शकते.
क्लिक करा