Tap to Read ➤
कोणती पारंपरिक साडी कुठून खरेदी करावी? बघा खास माहिती
काही पारंपरिक साड्या म्हणजे त्या- त्या प्रांतांची ओळख आहेत. म्हणूनच सिल्कच्या साड्यांची खरेदी करायची असेल तर कोणती साडी कुठून घ्यावी ते पाहा..
पैठणी ही महाराष्ट्राची ओळख. त्यामुळे पैठणीच्या खरेदीसाठी पैठण किंवा येवला याठिकाणी यायला हवे.
बांधणी साडी घ्यायची असेल तर गुजरातमध्येच त्याचे अगणित प्रकार मिळतील.
टाय- डाय प्रकारातून तयार झालेली लेहरिया साडी ही राजस्थानची ओळख. त्यामुळे तिथून ती साडी नक्की घ्या.
चंदेरी सिल्क साडी ही मध्यप्रदेशची ओळख. त्यामुळे मध्यप्रदेशात कधी फिरायला गेल्यावर चंदेरी साडीची खरेदी आठवणीने करा.
बनारसी शालू किंवा साडी घ्यायची असेल तर बनारस किंवा वाराणसी हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
कांजीवरम किंवा कांचीपुरम ही तामिळनाडूची ओळख. त्यामुळे या साडीचे अगणित प्रकार त्या प्रांतातच पाहायला मिळतात.
क्लिक करा