Tap to Read ➤

Girish Bapat : गिरीश बापट, पुण्याच्या राजकारणातील 'चाणक्य'

पुण्याच्या राजकारणात ‘सर्वसमावेशक’ राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांचं आज निधन झालं.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं आज पुण्यात निधन झालं. पुण्यातील राजकारणात बापट यांची चांगली पकड होती.
चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार, राज्याच्या मंत्रिमंडळात अशा अनेक भूमिका बजावल्या.
शहरातील मध्यवर्ती विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या कसबा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले.
गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. जनसंघापासून ते राजकारणात उतरले.
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जायचे. त्यांनी कामगारांसाठी अनेकदा लढाही दिला.
आणीबाणीनंतर गिरीश बापटांचा राजकीय प्रवास सुरू झाला. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला.
१९८३ मध्ये पुणे महानगरपालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर तीन वेळा त्यांचा विजय झाला.
१९९५ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. २०१४ पर्यंत ते सलग पाच वेळा निवडून आले.
२०१९ मध्ये त्यांना खासदारकीचं तिकीट देण्यात आलं. काँग्रेसच्या मोहन जोशींचा त्यांनी ९६ हजार मतांनी पराभव केला.
कसबा पेठ निवडणुकीतही तब्येत साथ देत नसताना भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरले होते.
प्रकृती अस्वस्थ असताना देखील गिरीश बापट यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत आणि पक्षाप्रती आपलं कर्तव्य बजावलं.
क्लिक करा