Tap to Read ➤

रेखाला आहेत ६ बहिणी! कुणी प्रसिद्ध डॉक्टर तर कुणी लोकप्रिय अ‍ॅक्टर

रेखाचे वडील स्टार अभिनेते होते. त्यांच्या ७ मुलींपैकी रेखा लोकप्रिय आहे, जाणून घेऊया इतर ६ जणींबद्दल...
Bollywood Actress Rekha 6 Sisters: बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आजही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. नव्या आणि तरूण अभिनेत्रींना अजूनही रेखाच्या सौंदर्याची भुरळ पडते.
रेखा आपल्या मुंबईतील भल्या मोठ्या बंगल्यात एकटीच राहते. पण फार कमी जणांना हे माहिती असेल की रेखाला ६ बहिणीही आहेत.
रेखाचे वडील जेमिनी गणेशन हे तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील स्टार अभिनेता होते. त्यांनी एकूण तीन लग्नं केली.
जेमिनी गणेशन यांना पहिल्या पत्नीपासून रेवथी, कमला, जया आणि नारायणी अशा ४ मुली झाल्या. दुसऱ्या पत्नीने प्रसिद्ध अभिनेत्री रेखा आणि राधा यांना तर तिसऱ्या पत्नीने विजया यांना जन्म दिला.
डॉ. रेवथी स्वामीनाथन ही रेखाची सर्वात मोठी बहिण आहे. रिर्पोट्सनुसार, त्या व्यवसायाने radiation oncologist डॉक्टर आहेत आणि अमेरिकेत राहतात.
रेखाच्या दुसऱ्या बहिणीचे नाव कमला सेल्व्हराज आहे. रिर्पोट्सनुसार, त्या देखील पेशाने डॉक्टर असून त्यांचे चेन्नईमध्ये स्वत:चे हॉस्पिटल आहे.
रेखाच्या तिसऱ्या क्रमांकाच्या बहिणीचे नाव नारायणी गणेश आहेत. रिर्पोट्सनुसार, त्या एक पत्रकार आहेत आणि एका मोठ्या मीडिया हाऊसशी जोडल्या गेल्या आहेत.
रेखाची सर्वात लहान बहिण म्हणजे जया श्रीधर. त्या स्वत: हेल्थ अडवायजर म्हणजेच स्वास्थ विषयक सल्लागार आहेत.
रेखाची पाचव्या क्रमांकाची बहिण राधा ही तिची एकमेव सख्खी बहिण आहे. राधा ही लग्नाआधी साऊथ इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री होती. उस्मान यांच्या विवाह झाल्यानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या.
रेखाची बहिण विजया चामुंडेश्वरी या देखील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. त्या एक ख्यातनाम फिटनेस एक्सपर्ट आहेत.
क्लिक करा