Tap to Read ➤

ऋतुराज बहरला! उत्कर्षा पवारसोबत विवाहबंधनात, पहा PHOTO's

क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड अन् उत्कर्षाच्या लग्नाचे फोटो आले आहेत.
महाबळेश्वरच्या ली मेरिडीअन रिसॉर्टमध्ये क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड विवाहबंधनात अडकला आहे.
आपली जीवनसाथी म्हणून महाराष्ट्रासाठी खेळणाऱ्या महिला क्रिकेटरची ऋतुराजने निवड केली होती.
पुण्याचीच असलेल्या उत्कर्षा पवार हिच्याशी ऋतुराजने ३ जून रोजी लग्न केले आहे.
पहिला फोटो समोर आल्यानंतर ती कोण आहे याबाबत क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली होती.
अनेकांना ती हिरोईन, एखादी मॉडेल किंवा त्याची जुनी मैत्रिण असल्याचे वाटले होते. परंतू, उत्कर्षा ही महाराष्ट्राची क्रिकेट प्लेअर आहे.
२४ वर्षीय उत्कर्षाचा जन्म १३ ऑक्टोबर १९९८ मध्ये पुण्यात झाला. ती महाराष्ट्राच्या महिलांच्या वरिष्ठ संघात खेळते.
ऋतुराज आणि उत्कर्षा मागील मोठ्या कालावधीपासून एकमेकांना ओळखत आहेत. मागील वर्षी उत्कर्षा एका जिम सेशनमध्ये ऋतुराजसोबत दिसली होती.
ऋतुराजचे अभिनेत्री सायली संजीवसोबत अफेयर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतू, मध्येच उत्कर्षाचे नाव आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
क्लिक करा