Tap to Read ➤

CSK शी ब्रेकअप अन् MI सोबत सेटिंग! हा खेळ पाहून 'लाडकी बहीण' नाराज

आयपीएल मेगा लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने चेन्नईच्या भिडूवर मोठा डाव खेळत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. ही योजना चहरच्या लाडक्या बहिणीला दुखावणारी आहे.
आयपीएल मेगा लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने चेन्नईचा हुकमी एक्का आपल्या ताफ्यात घेतला.
२ कोटी मूळ किंमत असलेल्या दीपक चहरसाठी मुंबई इंडियन्सच्या संघाने ९ कोटी २५ लाख रुपये मोजले.
दीपक चहरचं फक्त चेन्नई सुपर किंग्ससोबतच नव्हे तर MS धोनीशीही खास बॉन्डिंग आहे. त्यामुळे CSK सोबतच्या ब्रेकअपनंतर धोनीला खूप मिस करेल, अशी प्रतिक्रियाही त्याने दिलीये.
CSK शी ब्रेकअप अन् MI सोबतच्या सेटिंगच्या खेळानंतर दीपक चहरची पत्नी जया आणि त्याची लाडकी बहीण मालतीही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
दीपक चहरची पत्नी मालती चहर ही CSK ची कट्टर समर्थक राहिली आहे. ती धोनीची मोठी चाहतीही आहे.
CSK सोबतच्या आठवणींना उजाळा देत मालती चहरनं येलो आर्मीला मिस करेन, अशी भावना व्यक्त केलीये. ७ वर्षांच्या प्रवासात ३ ट्रॉफीचे साक्षीदार झाल्याचा क्षण अविस्मरणीय होता, असा उल्लेख मालतीनं केला आहे.
दीपक चहरची पत्नी जया भारद्वाज हिने धोनी आणि साक्षीसोबतचे फोटो शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्टँडमध्ये चीयर करण्यापासून ते भर मैदानात दीपक चहरला प्रेमाला होकार देण्यापर्यंतचा क्षण अविस्मरणीय होता. या गोष्टींमुळे CSK सोबतच बॉन्डिंग कायम राहिल, असे जयानं म्हटलं आहे.
क्लिक करा