Dream 11 आणि My11Circle वरुन कमाई केल्यास किती लागेल टॅक्स?
आयपीएलचा नवा सीझन सुरू झाला आहे.
आयपीएलचा नवा सीझन सुरू झाला आहे. अशातच जे लोक गेममध्ये पैसे लावून कमाई करतात त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
अनेक जण Dream11 आणि My11Circle सारख्या फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्मवर खेळून कमाई करतात. अशातच त्यांच्या कमाईवर किती टॅक्स लागू शकतो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
आयकर कायदा १९६१ च्या कलम १९४ बी नुसार लॉटरी, गेम शो, पझल्स आणि अन्य स्पर्धांमधून जिकलेल्या रकमेवर ३० टक्क्यानुसार टीडीएस लागू होतो.
जर तुम्ही जिंकलेली एकूण रक्कम १० हजार किंवा अधिक असेल तर ३०% टीडीएस कापला जाईल.