Tap to Read ➤

Duleep Trophy : MI च्या स्टारची छान गोलंदाजी; खान बंधूंसह रिंकूही फसला

दुलिप करंडक स्पर्धेतील MI च्या ताफ्यात दिसेलल्या गड्याने भारत 'क' कडून केली हवा
दुलिप करंडक स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील भारत 'ब' विरुद्धच्या सामन्यात MI च्या ताफ्यात दिसेलल्या गड्याने भारत 'क' कडून हवा केली.
भारत 'क'च्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज अंशुल कंबोज याने कमालीच्या स्पेलसह भारत 'ब' संघातील आघाडीच्या ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
अंशुल कंबोजनं जगदीशनच्या रुपात आपल्या खात्यात पहिली विकेट जमा केली.
त्यानंतर दुलिप करंडक स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या मुशीर खान यालाही त्याने अवघ्या एका धावेवर तंबूचा रस्ता दाखवला.
धाकट्या भावानंतर अंशुल कंबोजनं थोरल्या भावाचा खेळ खल्लास केला. सर्फराज खानला त्याने १६ धावांवर पायचित केले.
IPL स्टार रिंकू सिंगही त्याच्यासमोर फिका ठरला. अवघ्या ६ धावांवर अंशुल कंबोजनं त्याला तंबूत धाडले.
नितीश कुमार रेड्डीला क्लीन बोल्ड करत कंबोजनं फाइव्ह विकेट्स हॉलच्या क्लबमध्ये एन्ट्री मारली.
क्लिक करा