" मग लग्न करुन फायदा काय?" धनश्री वर्माला कुणी अन् का मारला हा टोमणा
ती क्रिकेटरची पत्नी असली तरी तिनं स्वत:ची एक वेगळी ओळखही निर्माण केलीये.
भारताचा स्टार क्रिकेटर युझवेंद्र चहलची पत्नी आणि डान्स कोरिओग्राफर धनश्री वर्मा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
ती एका क्रिकेटरची पत्नी असली तरी डान्स स्किलच्या जोरावर तिने आपला स्वत:चा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
धनश्री वर्माही युझीसोबत बिझी राहण्यापेक्षा बहुतांश वेळा सोलो (सिंगल) सीन छबीसह लक्षवेधून घेताना दिसते.
क्रिकेटरची पत्नी आणि सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा असलेल्या धनश्रीनं नुकतेच सोशल मी़डियाच्या माध्यमातून काही खास फोटो शेअर केले आहेत. यात पुन्हा ती एकटीच दिसत आहे.
या नव्या फोटोजमध्ये धनश्री खवय्येगिरीचा आपला खास अंदाज दाखवून देताना दिसते. तिच्या या पोस्टवर अनेक लाईक्स कमेंट पाहायला मिळत आहे.
तिच्या फ्रेममध्ये चहल न दिसल्याने एका वापरकर्त्यानं धनश्रीला टोमणा मारल्याचे दिसते. ही कमेंट चांगलीच चर्चेत आहे.
पती पासून दूर राहायचे तर लग्न करण्याचा फायदा काय? या आशयाच्या कमेंटसह नेटकऱ्याने धनश्रीला फिरकी घेतल्याचे दिसून येते.
धनश्री आणि चहल दोघांच्यात काहीतरी बिनसलंय अशी चर्चा याआधीही रंगली होती. त्याला कारणीभूत ठरली होती ती धनश्रीची एक पोस्ट. पण त्यानंतर दोघांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. एवढेच नाही तर त्यानंतर अनेकदा या जोडीनं एका फ्रेममध्ये येत एकमेकांवरील प्रेम दाखवून दिले होते.