Tap to Read ➤

सारखी ॲसिडीटी होत असेल तर टाळा ८ पदार्थ

ॲसिडीटीची समस्या दूर होण्यासाठी करा आहारात बदल
सोडा घेतल्याने ॲसिडीटी कमी होते असा आपला समज असतो. मात्र अशा थंड पेयांमुळे ॲसिडीटी वाढते.
ॲसिडीटी होऊ नये म्हणून लिंबू, संत्री, मोसंबी, अननस अशी आंबट फळे अजिबात खाऊ नयेत.
चीजसारख्या दुधापासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे ॲसिडीटीची समस्या वाढण्याची शक्यता असते.
पास्ता, पिझ्झा यांसारख्या पदार्थांमध्ये असलेले मैदा आणि चीज हे घटक ॲसिडीटीसाठी घातक असतात, ते टाळावेत.
नेहमी ॲसिडीटी होत असेल तर तळलेले पदार्थ खाणे टाळावे, कारण त्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात.
चॉकलेट खाल्ल्यावर आपले हॅपी हॉर्मोन्स जागृत होतात. मात्र काहींना चॉकलेट पचत नाही त्यामुळे चॉकलेट टाळलेले बरे.
तिखट किंवा मसालेदार पदार्थांमुळेही ॲसिडीटीची समस्या वाढते त्यामुळे ॲसिडीटी असणाऱ्यांनी असे पदार्थ शक्यतो टाळावेत.
अनेकदा आपल्याला थकवा आल्यावर किंवा थंड वातावरणात कॉफी घेण्याची इच्छा होते. पण कॉफीने ॲसिडीटी वाढते.
क्लिक करा