Tap to Read ➤

'घरत गणपती'च्या प्रमोशनसाठी अश्विनी भावेंचा क्लासी लूक

९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे.
उत्तम अभिनयासह सौंदर्याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
अश्विनी यांनी मराठीसह हिंदी सिनेमातही काम केलं आहे.
सध्या मनोरंजन विश्वात अश्विनी भावेंच्या आगामी 'घरत गणपती' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.
जवळपास २५ वर्षानंतर अश्विनी भावे आणि अजिंक्य देव या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.
दरम्यान, अश्विनी भावे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय.
अश्विनी भावे सोशल मीडियावर कमालीच्या सक्रिय आहेत.
नुकतेच त्यांनी निळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
अश्विनी भावेंचा हा क्लासी लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.
क्लिक करा