Tap to Read ➤

नसांमध्ये रक्त आणि शक्ती निर्माण करतं हे कडधान्य

चण्यांमध्ये प्रोटीन, फायबर, आयरन, व्हिटॅमिन्स आणि अनेक प्रकारचे मिनरल्स भरपूर असतात.
चण्यांमुळे पोट, कोलेस्ट्रॉल, डायबिटीस, लठ्ठपणा, रक्ताची कमतरता, कॅन्सर आणि हृदयाच्या अनेक आजारांना दूर ठेवलं जाऊ शकतं.
काळ्या चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं जे पचन तंत्राला चांगलं करतं. याने शरीरातील सगळे विषारी पदार्थ बाहेर निघतात.
कॅल्शिअम भरपूर असल्याने काळ्या चण्यांचं नियमित सेवन केल्याने हाडेही मजूबत होतात.
चण्यांमध्ये कार्बोहायड्रेट, अमीनो अॅसिड, प्रोटीन, फ्लेवोनॉइड, आयरन, फॉस्फेट, फ्लोराइड असेही तत्व असतात जे अॅंटी-ऑक्सिडेंच्या रूपात काम करतात.
चण्यांमुळे शरीरात ब्लड फ्लो चांगला होतो. यात अॅंटी-ऑक्सिडेंट, एंथोसायनिन, सायनाइडिन, फायटो न्यूट्रिएंट्स भरपूर असतात. ज्यामुळे रक्तवाहिन्या हेल्दी होतात. रक्ताच्या गाठीही तयार होत नाहीत.
काळ्या चण्यांमध्ये फायबर भरपूर असल्याने मेटाबॉल्जिम मजबूत होतं आणि वजन कमी करण्यासही मदत होते. याने जास्त वेळ पोट भरलेलं राहतं.
काळ्या चण्यांमध्ये मॅग्नेशिअम भरपूर असतं. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. तसेच कोलेजन तयार करण्यासही मदत होते. ज्यामुळे त्वचा तरूण दिसते.
रात्री एक वाटी चणे भिजवून ठेवा. सकाळी त्याच पाण्यात उकडून किंवा कच्चेही खाऊ शकता. चणे तुम्ही चाट, भाजी किंवा सलादच्या रूपातही खाऊ शकता.
क्लिक करा