Tap to Read ➤
उन्हाचा ताप, उष्माघाताचा फटका बसलाय हे कसे ओळखाल, हे आहेत संकेत...
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघाताचे बळी गेलेत... मित्र परिवार, नातेवाईकांची काळजी घ्या...सर्वांना सांगा...
उन्हाचा कोप आता वाढू लागलाय, परवाच उष्माघातामुळे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात १३ बळी गेलेत.
तुम्हाला उन लागल्याचा त्रास होत नसेल, परंतू शरीराला बाधा झाली असेल... मुले दुपारची खेळतात...
आपले शरीर उन्हाळा लागल्याचे संकेत देते. ते संकेत काय असतात... नवाजातपासून ते थोरांनी काय काळजी घ्यावी....
उन्हाचा त्रास जाणवायचा नसेल तर तहान लागणार नाही एवढे पाणी सतत पित जा. घरातल्या मुलांना पाजत जा.
जाड, फिट, नायलॉनचे कपडे घालणे टाळावे. त्याऐवजी ढिले, हवेशीर होजियरीचे रंग शक्यतो पांढरा किंवा सौम्य असलेले कपडे घालावेत.
नवजात बालकांना सर्वाधिक त्रास होतो. त्यांचा त्वचेचा रंग थोडा पिवळसर दिसू लागतो. त्यांना कपड्यात गुंडाळू नका.
ताप आला तर...
उन्हाचा ताप कसा ओळखाल? एक जरी लक्षण दिसले तर हा उन्हाचा ताप आहे हे ओळखावे. लगेच डॉक्टरकडे जावे.
आजाराच्या तापात तळहात तळपाय गार असतात. उन्हाच्या तापात ते गरम असतात.
दोन बोटात गाल धरा. एक बोट तोंडाच्या आतील भागात आणि एक बाहेरील त्वचेवर. आतल्यापेक्षा बाहेरच्या बोटाला जास्त उष्णता लागली तर तो ताप उन्हाचा असतो.
गळ्याला हात लावल्यास उन्हाचा ताप असेल तर घाम लागत नाही. त्वचा कोरडी असते.
सारखी तहान लागते. लघवीला कमी होते. लघवी पिवळी होते, तसेच उग्र वासही येतो.