केसांच्या सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय! करुन तर पाहा
केसांची वाढ उत्तम होण्यासाठी ४ प्रकारचे होममेड तेल अतिशय उपयुक्त ठरतात. कारण त्यामुळे केसांचं उत्तम पोषण होतं.
हे तेल नेमके कोणते आहेत आणि ते कसे तयार करायचे, ते पाहूया....
यासाठी पहिलं आहे जास्वंदाचं तेल. खोबरेल तेलामध्ये जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या आणि मेथी दाणे टाकून तेल उकळून घ्या. नंतर २ तासांनी तेल गाळून बाटलीत भरा आणि नियमितपणे लावा. केसांची चांगली वाढ होईल.
खोबरेल तेलात कोरफडीचा गर टाकून तेल उकळून घ्या. यामुळेही केस सिल्की, चमकदार होण्यास मदत होते.
खोबरेल तेलात कढीपत्त्याची पाने टाकून उकळवा. हे तेल आठवड्यातून २ वेळा लावा. पांढऱ्या केसांची समस्या कमी होईल.
खोबरेल तेल आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करा आणि त्यात रोजमेरी इसेंशियल ऑईलचे काही थेंब टाका. याच्या नियमित वापराने केस गळणं कमी होतं.