Tap to Read ➤

वेस्ट इंडिजचा रोविंद्र रामनरीन कसा बनला रॉबिन सिंग?

आपण ज्याला रॉबिन सिंग म्हणून ओळखतो त्याचं मुळ नाव हे रोविंद्र रामनरीन आहे, हे किती जणांना माहित्येय?
रॉबिन सिंग... भारताचा उत्तम क्षेत्ररक्षक अन् स्फोटक फलंदाज... वेस्ट इंडिजचा पोरगा भारतात हिट!
त्रिनिदाद अँड टोबॅगो येथील प्रिन्स टाऊन येथे जन्मलेला रॉबिन भारतीय क्रिकेटचा स्टार बनेल याची कल्पनाच नसावी
१४ सप्टेंबर १९६३ साली प्रिन्स टाऊन येथील त्याचा जन्म, तिथून ते मुंबई इंडियन्स चा फिल्डींग कोच असा त्याचा प्रवास.
११ मार्च १९८९ मध्ये भारताच्या वन डे संघातू त्याने केले आणि तगडी स्पर्धा असतानाही १२ वर्ष स्थान टिकवून ठेवले.
१३६ वन डे सामन्यांत त्यानं १ शतक व ९ अर्धशतकांसह २३३६ धावा केल्या. प्रथम श्रेणीत २२ शतकं त्याच्या नावावर आहेत
रॉबिनच्या वडिलांचे नाव रामनरीन आणि आईचे नाव सावित्री सिंग असे आहे. त्याचं आजोळ मुळचं अजमेरचं.
वयाच्या 19व्या वर्षी तो मद्रास येथे स्थलांतरीत झाला. मद्रास विद्यापीठातून अर्थशास्त्राची मास्टर पदवी घेतली.
रॉबिनचं मुळनाव रोविंद्र रामनरीन असे आहे आणि १९८२-१९८३ या कालावधीत त्यानं त्रिनिदाद युवा क्रिकेट संघाचे नेतृत्व केले
एकदा हैदराबाद ब्लू नावाचा संघ त्रिनिदाद दौऱ्यावर क्रिकेट स्पर्धेसाठी गेला होता. तेव्हा रॉबिन त्रिनिदादकडून खेळला होता
रॉबिनच्या कामगिरीनं हैदराबाद ब्लू संघातील इब्राहिम नावाच्या व्यक्तिला प्रभावित केलं. त्यानं रॉबिनला मद्रासला बोलावलं
रॉबिन सिंगला भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. पण, त्यानं जिद्द सोडली नाही.
१९८९मध्ये रॉबिननं भारतीय संघाकडून पदार्पण केलं आणि भारतीय संघाकडून खेळणारा तो पहिला परदेशी खेळाडू ठरला.
२००८ मध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबाद संघानं त्याची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. सध्या तो मुंबई इंडियन्स संघाचा फिल्डींग कोच आहे.
क्लिक करा