शाहरुख खान, करिना कपूर यांची मुलं अंबानींच्या शाळेत शिकतात. जाणून घ्या किती आहे त्यांच्या मुलांची शाळेची फी?
मुकेश अंबानी हे आशियातील दिग्गज व्यवसायिक आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांचा व्यवसाय परसलेला आहे.
मुकेश अंबानी हे शाळेमधूनही कमाई करता. परंतु त्याचं कामकाज त्यांच्या पत्नी नीता अंबानी पाहतात. पाहूया यातून ते कमाई करतात.
मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही भारतातील सर्वात महागड्या आणि प्रतिष्ठीत शाळांपैकी एक आहे.
या शाळेची वार्षिक कमाई २१.६ मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास १८० कोटींपेक्षा अधिक असल्याचं म्हटलं जातं.
ही आकडेवारी RocketReach च्या डेटावर आधारित आहे. जी शाळेच्या कमाईला रजिस्ट्रेशन आणि फी च्या रुपात दर्शवते.
शाळेची फी ही वार्षिक १ लाख ७० हजार ते ४,४८,००० रुपये पर्यंत असते, जी वर्ग आणि ग्रेडवर अवलंबून आहे.
श्रीमंतांशिवाय बॉलिवूड सेलिब्सचीही ही शाळा आवडती आहे. शाहरुख खान, ऐश्वर्या राय, करीना कपूर सारख्या कलाकारांची मुलंही या शाळेत शिकलेत.