Tap to Read ➤

बाथरुममधून दुर्गंध येतो, पाच कारणे व पाच उपाय, स्वच्छ होऊन जाईल

बाथरुम कितीही स्वच्छ दिसला तरी एक घाणेरडा वास, दुर्गंधी येत असते. पाहुळे रावळे आले, इतर कोणी आले तर...
पावसाळा आलाय, कोणी पाहुणा आला, मित्र आला तर आपल्याला किती विचित्र वाटेल.
ही दुर्गंधी येण्याची काही कारणे आहेत. त्यावर उपाय केला तर बाथरुम स्वच्छ तर असेलच परंतू वासही येणार नाही.
पी ट्रॅप एक यु आकाराचा पाईप असतो, जो टॉयलेट सीटच्या मागे व सिंकला जोडलेला असतो. तो हवा आणि सीवेज गॅस मध्ये रोखण्याचे काम करतो. यातील पाणी कमी झाले तर वास येऊ लागतो.
उपाय: जास्त काही करण्याची गरज नाहीय. पाणी ओता आणि समस्या दूर करा. ब्लॉकेज असेल तर पाण्यात विनेगर किंवा बेकिंग सोडा मिक्स करा.
ड्रेनेज जाम झाल्यास...

केस, साबन सारख्या गोष्टी अडकल्याने ड्रेनेज जाम होते. यासाठी आतील अडकलेला कचरा बाहेर काढावा. वास येणे बंद होईल.
टॉयलेट सीट तुटली फुटली असेल तर दुर्गंधी पसरू लागते. यामुळे छेद छोटा असेल तर तुम्ही स्वत: सील करू शकता. मोठा असेल तर तुम्हाला भांडे बदलण्याची गरज आहे.
टॉयलेट पॉटमधून बुडबुड्यांचा किंवा वेगळा आवाज येत असेल तर ते जाम झाल्याने होऊ शकते. अशावेळी दुर्गंध पसरतो.
उपाय : टॉयलेट टँकमध्ये गरम पाणी आणि व्हिनेगर टाकून 2-3 वेळा फ्लश करण्याचा प्रयत्न करावा.
टॉयलेट असल्याने बाथरुममध्ये सर्वाधिक बॅक्टेरिया असतात. यामुळे ४-५ दिवसांनी स्वच्छता करावी. यासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचा वापर करू शकता.
क्लिक करा