Tap to Read ➤

केसांच्या 'या' ५ समस्या कमी करण्यासाठी जास्वंद वापरा

जास्वंदाचं फुल केस आणि त्वचा या दोन्हींसाठी अतिशय गुणकारी आहे. बघा केसांच्या समस्यांवर जास्वंदाचे फुल कसे जादुई परिणाम करणारे ठरते....
जास्वंदाच्या फुलाच्या पाकळ्या आणि पाने वाटून घ्या आणि बदाम तेल, खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल यांच्यामध्ये एकत्र करून डोक्याला मालिश करा. केसांना चांगलं टॉनिक मिळेल.
जास्वंदाची फुलं आणि कांदा एकत्र वाटून घ्या. त्याचा रस काढून केसांना लावा. केस भराभर वाढतील.
कोंडा असेल किंवा डोक्यात वारंवार खाज येत असेल तर हा त्रास कमी करण्यासाठी जास्वंदाच्या फुलांचा लेप लावणे उपयोगी ठरते.
जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या मिक्सरमधून वाटून घ्या. त्यामध्ये थोडं ग्लिसरीन, थोडं ऑलिव्ह ऑईल टाकून हे मिश्रण केसांवर लावा. केस चमकदार- सिल्की होतील.
केस खूप गळत असतील तर जास्वंदाची पाने वाटून त्यांचा रस केसांच्या मुळाशी लावा. रक्तप्रवाह वाढून केसांची मुळं पक्की होण्यास मदत होईल.
क्लिक करा