Tap to Read ➤
छोट्याखानी खेळीसह किंग कोहलीची तेंडुलकरच्या क्लबमध्ये एन्ट्री
एक नजर घरच्या मैदानावर १२ पेक्षा अधिक धावा काढणाऱ्या आघाडीच्या ५ फलंदाजांवर
बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीतील दुसऱ्या डावातही विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.
किंग कोहलीनं पहिल्या डावात ६ धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात १७ धावांवर विकेट फेकली.
किंग कोहलीनं या अल्प खेळीसह खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे. घरच्या मैदानात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने १२ हजार धावांचा टप्पा गाठला आहे.
कोहलीनं घरच्या मैदानात कसोटीत ४१६१ धावा केल्या आहेत. वनडेत ६२६८ आणि आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात त्याच्या खात्यात १५७७ धावा जमा आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर १४,१९२ धावांसह टॉपला आहे.
या यादीत रिकी पाँटिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने घरच्या मैदानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना १३,११७ धावा कुटल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस १२ हजार ३०५ धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
श्रीलंकेच्या कुमार संगकारानं घरच्या मैदानात १२ हजार ४३ धावा काढल्या आहेत.
क्लिक करा