Tap to Read ➤

IND vs BAN: १, २, ३ नव्हे; तब्बल या ७ रेकॉर्ड्सवर असेल अश्विनची नजर

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विन मोठा धमाका करणार?
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत ४ विकेट्स घेताच अश्विन कर्टनी वॉल्श (५१९ विकेट्स) यांना मागे टाकेल.
सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत नॅथन लायनला (५३० विकेट्स) मागे टाकण्याचीही अश्विनकडे संधी आहे. यासाठी त्याल आणखी १५ विकेट्सची आवश्यकता आहे.
अश्विननं आतापर्यंत ३६ वेळा ५ विकेट्स हॉलचा पराक्रम नोंदवला आहे. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन वेळा हा पराक्रम केला तर तो दिवंगत दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नला मागे टाकेल. वॉर्ननं आपल्या कसोटी कारकिर्दीत ३७ वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
अनिल कुंबळेचा रेकॉर्डही अश्विनच्या टप्प्यात आहे.  सध्याच्या घडीला अनिल कुंबळे  घरच्या मैदानात १५३ सामन्यात ४७६ विकेट्स घेतल्या आहेत. कुंबळे यांना मागे टाकण्यासाठी अश्विनला आणखी २२ विकेट्ससह मिळवाव्या लागतील.
WTC मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये टॉपला जाण्यासाठी अश्विनला १४ विकेट्सची गरज आहे. सध्याच्या घडीला नॅथन लायन १८७ विकेट्ससह टॉपला आहे.
WTC च्या चालू हंगामात टॉपर होण्यासाठी त्याला फक्त १० विकेट्स मिळवायच्या आहेत. सध्या याबाबतीत ऑस्ट्रेलियन जोश हेजलवूड ५१ विकेट्स सह टॉपला आहे.
बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये झहीर खान (७ सामन्यातील १४ डावात ३१ विकेट्स) आघाडीवर आहे. ९ विकेट्स घेतल्या तर झहीरला मागे टाकून याबाबतीत अश्विन नंबर वन होईल.
क्लिक करा