Tap to Read ➤

गिलची लाजिरवाणी कामगिरी; त्याआधी कोहलीसह या दिग्गजांवर आली ही वेळ!

कसोटीत एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे भारतीय फलंदाज
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शुबमन गिलच्या पदरी भोपळा आला.
हसन महमूद याने गिलला खातेही उघडू दिले नाही. शून्यावर बाद होताच गिलच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.
बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात शुबमन गिल ८ चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. यासह गिल एका कॅलेंडर ईयरमध्ये तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा शून्यावर बाद होणारा सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे.
या यादीत किंग कोहलीचाही समावेश आहे. २०२१ मध्ये कोहली तीन वेळा शून्यावर बाद झाला होता.
एका वर्षात कसोटीत तीन किंवा त्यापेक्षा अधिकवेळा शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या या लाजिरवाण्या रेकॉर्ड्सच्या यादीत विनोद कांबळीचाही समावेश आहे. १९९४ मध्ये त्याच्यावर ही वेळ आली होती.
मोहिंदर अमरनाथ एका कॅलेंडर ईयरमध्ये कसोटीत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे भारतीय फलंदाज आहेत. १९८३ मध्ये या दिग्गजावर पाच वेळा अशी नामुष्की ओढावली होती.
दिलीप वेंगसरकर १९७९ या कलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाले होते.
मन्सूर अली खान पतौडी हा दिग्गज क्रिकेटरही या यादीत आहे. १९६९ मध्ये त्यांच्यावर वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याची वेळ आली होती.
क्लिक करा