Tap to Read ➤

IND vs BAN कसोटीत सर्वाधिक धावा करणारे टॉप १० फलंदाज

कोण आहे टॉपर? या यादीत किंग कोहली कितव्या क्रमांकावर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत अव्वलस्थानी आहे. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याच्या खात्यात ८२० धावा जमा आहेत.
मुशफिकुर रहिम या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने टीम इंडियाविरुद्धच्या कसोटीत ६०४ धावा काढल्या आहेत.
राहुल द्रविडनं बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत ५६० धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
चेतेश्वर पुजारानं बांगलादेश विरुद्ध खेळताना ४६८ धावा केल्या आहेत.
विराट कोहली या यादीत ४३७ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
मोहम्मद अश्रफुल याने भारताविरुद्धच्या कसोटीत ३८६ धावा केल्या आहेत.
भारतीय संघाचा विद्यमान कोचही टॉप १० मध्ये आहे. गंभीरच्या खात्यात बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत एकूण ३८१ धावांची नोंद आहे.
शाकिब अल हसन याच्या खात्यात ३७६ धावांची नोंद आहे.
भारतीय क्रिकेटमधील दादा सौरव गांगुलीनं बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत ३७१ धावा केल्या आहेत.
बांगलादेशचा महमदुल्लाह या यादीत १० व्या क्रमांकावर आहे. त्याच्या खात्यात ३४७ धावा जमा आहेत.
क्लिक करा