3 IPL स्टार ज्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळू शकते पदार्पणाची संधी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात अनेक नव्या चेहऱ्यांंची लागलीये वर्णी
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ४ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज आहे.
बांगलादेश विरुद्धच्या घरच्या मैदानातील टी-२० मालिकेप्रमाणेच या दौऱ्यावरही भारतीय संघात युवा क्रिकेटपटूंचा भरणा असल्याचे पाहायला मिळते.
इथं एक नजर टाकुयात अशा खेळाडूंवर जे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्या टी-२० सामना किंवा या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकतात अशा चेहऱ्यांवर
कर्नाटकचा जलदगती गोलंदाज विजयकुमार वैशक याने आयपीएल २०२४ मध्ये RCB कडून खेळताना लक्षवेधी कामगिरी करून दाखवली आहे.
आयपीएलमध्ये या गोलंदाजाच्या नावे ३० सामन्यात ४२ विकेट्स जमा आहेत. या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडिया वर्णी लागल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला पदार्पणाची संधी मिळाली तर नवल वाटू नये.
यश दयाल हा देखील पदार्पणासाठी वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या खेळाडूंपैकी एक आहे. हा तोच गोलंदाज आहे ज्याला रिंक सिंहनं ५ षटकार मारले होते. पण यातून सावरत त्याने दमदार कमबॅक करून टीम इंडियात एन्ट्री मारलीये.
तोही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यातून पदार्पण करताना दिसू शकतो.
रमनदीप सिंह याने आपल्या अष्टपैलू कामगिरीची विशष छाप सोडली आहे. शिवम दुबे संघाचा भाग नसल्यामुळे या खेळाडूला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पदार्पणाची संधी मिळाल्याचे पाहायला मिळू शकते.