लिलावात 'हिरो' पण कामगिरीत 'झिरो' ठरलेले ४ खेळाडू
IPL 2025 च्या मेगा लिलावात ज्यांना मोठी रक्कम मिळाली, अशा काही खेळाडूंना अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही.
या खेळाडूंमध्ये सर्वाधिक २७ कोटींमध्ये लखनौकडे गेलेला यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्यासह एकूण चार खेळाडू आहेत.
ऋषभ पंत - २७ कोटी (LSG) - सामने : ९, धावा : १०६, स्ट्राईक रेट : २६.३६, सर्वोत्तम खेळी : ६३ धावा.
व्यंकटेश अय्यर - २३.७५ कोटी (KKR) - सामने : ७, धावा : १३५, स्ट्राइक रेट : १३९.१७, सर्वोत्तम खेळी : ६० धावा
मोहम्मद शमी - १० कोटी (SRH) - सामने : ७, बळी : ५, सरासरी: ५२.२०, इकॉनॉमी : १०.८, सर्वोत्तम मारा : २/२८
ईशान किशन - ११.२५ कोटी (SRH) - सामने : ७, धावा : १३८, स्ट्राइक रेट : १७०.३७, सर्वोत्तम खेळी : नाबाद १०६