Tap to Read ➤

४० हजारात सिनेमा बनला, २९ लाख कमावले अन् चाहत्यांनी ६ तास रांग लावली

एक असा हिंदी सिनेमा, जो पाहण्यासाठी  ६-६ तास रांगा लावाव्या लागल्या
जेव्हा हिंदी सिनेसृष्टी सुरू झाली, तेव्हा बॉलीवूडचे स्टार्स त्यांच्या चाहत्यांसाठी देव बनतील असं क्वचितच कुणाला वाटलं असेल.
बॉलीवूड स्टार्सची झलक पाहण्यासाठी आत्ताच नाही तर बॉलिवूडच्या सुरुवातीपासून तोच जोश आणि उत्साह कायम आहे.
बॉलीवूडचा एक असा चित्रपट, ज्याला बनवण्यासाठी ४० हजार रुपये लागले होते, पण या चित्रपटाने २९ लाखांची कमाई केली होती.
१२४ मिनिटांच्या चित्रपटासाठी लोक ६-६ तास रांगेत उभे होते. एवढेच नाही तर सिनेमासाठी त्यांनी पोलिसांच्या काठ्याही खाल्ल्या.
देशातील हा चित्रपट ९२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित झाला, ज्याचे नाव होते 'आलम आरा'
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात या चित्रपटाची नोंद झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अर्देशीर इराणी यांनी केले होते.
त्या काळात नाटके, मूकपटांच्या माध्यमातून लोकांना सिनेमाची ओळख झाली. पण पडद्यावर आवाज असलेला सिनेमा आला होता.
'आलम आरा' चित्रपट पाहण्यासाठी लोक वेडे झाले होते. चित्रपटाचा पहिला शो दुपारी ३ वाजता सुरू होणार होता
लोकांची क्रेझ अशी की तिकीट खरेदीसाठी लोकांची गर्दी ६-६ तास अगोदरच चित्रपटगृहांबाहेर जमायची.
त्यावेळी केवळ ५-१० रुपयांची मोठी रक्कम असताना चित्रपटाची तिकिटे ५० रुपयांना ब्लॅक करून सिनेप्रेमींनी तीही खरेदी केली.
क्लिक करा