Tap to Read ➤

२० दिवस सुखाचे! ‘या’ ५ राशींवर महालक्ष्मीची कृपा

फेब्रुवारीतील ग्रहांचे राशीपरिवर्तन काही राशींना अत्यंत शुभ फलदायी ठरु शकेल.
फेब्रुवारी महिन्यात ४ महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करणर आहेत. यातील पहिले राशीपरिवर्तन बुध ग्रहाचे आहे.
बुध ग्रह धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. फेब्रुवारी अखेरीपर्यंत बुध ग्रह या राशीत विराजमान असेल.
बुध गोचराने काही राशींवर लक्ष्मी देवीची कृपा होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव?
मेष: पराक्रम आणि साहस वाढू शकेल. नशिबाची साथ मिळू शकेल. सर्व कामांचे शुभ परिणाम मिळतील.
वृषभ: नियोजित कामे काही कारणाने रखडतील. पैशाअभावी काही कामे थांबू शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
मिथुन: शुभ परिणामकारक काळ. फायदेशीर घटना घडतील. कामांतून नफा, यश मिळेल. मित्रांकडून लाभ मिळेल.
कर्क: काही लोकांशी मतभेद होऊ शकतात. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो.
सिंह: शुभ फलांची प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल. नफा कमावायची संधी मिळेल. समाधान मिळेल.
कन्या: काही कारणाने तुमच्या मनात अस्वस्थता वाढेल. बेचैनी वाढू शकेल. कोणत्याही प्रकारच्या वादात पडणे टाळावे.
तूळ: मालमत्ता खरेदी करू शकता. दिग्गज व्यक्तींशी ओळखी होऊ शकतील. त्याचा फायदा होऊ शकेल.
वृश्चिक: कामात अडथळे येतील. खर्चांकडेही लक्ष द्यावे लागेल. वाद टाळावे. मानसिक त्रास संभवतो.
धनु: हितशत्रू नुकसान करू शकतात. मित्रांसोबतचे संबंध सुधारतील. समाजातील ओळखी वाढतील.
मकर: काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. वडिलांचे सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च टाळा.
कुंभ: काही कारणाने मानसिक तणाव येऊ शकतो. खर्च वाढू शकतील. विरोधकांचा त्रास सहन करावा लागू शकेल.
मीन: मनोकामना पूर्ण होतील. नशिबाची साथ मिळेल. उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. नोकरदारांची आर्थिक स्थिती सुधारेल.
इच्छापूर्तीसाठी महाशिवरात्रीपासून सुरू करा बिल्वपत्राचे 'हे' साधे सोपे उपाय!
वाचा, संपूर्ण लेख
क्लिक करा