मुग्धा आणि गौतमीच्या मंगळसूत्राचे पाहा सुरेख डिझाइन्स
अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि सारेगमप फेम गायिका मुग्धा वैशंपायन या दोघी नुकत्याच बोहल्यावर चढल्याअसून त्यांच्या मंगळसूत्राचं डिझाईन कसं आहे, याची उत्सूकता अनेकजणींना आहे.
गौतमीच्या लग्नाच्या लूकची, तिच्या साडीची आणि दागिन्यांची हटके चॉईस अनेकींना आवडून गेली.
तर बऱ्याच जणींनी मुग्धाने घातलेल्या पारंपरिक दागिन्यांचे तोंडभरून कौतूक केले.
दोघींच्याही मंगळसूत्र डिझाईनमध्ये मात्र बऱ्यापैकी सारखेपणा दिसून आला.
दोघींचेही मंगळसूत्रात काळ्या मण्यांचे प्रमाण जास्त होते. मुग्धाच्या मंगळसूत्रामध्ये काळ्या मण्यांच्या दोन माळा होत्या.
तर गौतमीच्या मंगळसूत्रामध्ये दोन काळ्या मण्यांच्या माळेमध्ये एक सोन्याची बारीक साखळी होती.