'आई कुठे काय करते' या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा गोरे नावारुपाला आली.
या मालिकेत तिने अरुंधतीच्या मुलीची म्हणजेच ईशाची भूमिका साकारली होती.
तिने साकारलेलं हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.
सध्या अपूर्वा सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोशूटला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
पांढरा वनपीस, हातात फूल आणि हटके हेअरस्टाईल करुन तिने हे फोटोशूट केलं आहे.
अपूर्वाच्या या फोटोंनी नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.