न्यूझीलंडविरुद्ध Rishabh Pant नं सेट केला फास्टर फिफ्टीचा नवा रेकॉर्ड
याआधी कुणी झळकावलं होतं सर्वात जलद अर्धशतक?
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात रिषभ पंतनं विक्रमी अर्धशतक झळकावले.
न्यूझीलंड विरुद्धच्या मुंबई कसोटी सामन्यात पंतनं अवघ्या ३६ चेंडूत अर्धशतक साजरे केले. किवी संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूनं झळकवलेले हे सर्वात जलद अर्धशतक ठरले.
याआधी हा विक्रम यशस्वी जैस्वालच्या नावे होता. पुणे कसोटी सामन्यात भारताच्या युवा सलामीवीरानं ४१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.
मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात पंतनं शुबमन गिलच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली.
पंतन न्यूझीलंड विरुद्धच्या मुंबई कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ५९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६० धावांची खेळी केली.
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील बंगळुरु कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात पंतन ९९धावांची खेळी केली होती.
कसोटीत कोणत्याही संघाविरुद्ध भारताकडून सर्वात जलद फिफ्टीचा विक्रमही पंतच्या नावे आहे. २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने २८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
ओवरऑल कसोतीट सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा पाकिस्तानच्या मिसबाह उल हकच्या नावे आहे. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने अबू धाबीच्या मैदानात २१ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.