Tap to Read ➤
१८ वर्षांच्या पोरासमोर पाकिस्तान झुकले! कोण आहे रेहान अहमद?
पाकिस्तानी वंशांच्या रेहानने बाबर आजम अँड टीमची हालत खराब केली. त्याने शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला.
पाकिस्तानवर पराभवाची नामुष्की ओढावली आहे आणि त्याला कारण ठरलाय तो इंग्लंडचा १८ वर्षीय रेहान अहमद
पदार्पणवीर रेहान अहमदने कराची कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाच विकेट्स घेतल्या आणि विक्रम केला.
वय वर्ष १८ व १२६ दिवस... कसोटी पदार्पणात डावात पाच विकेट्स घेणारा रेहान अहमद हा युवा गोलंदाज ठरला.
रेहानने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स याचा २०११ सालचा विक्रम मोडला. तेव्हा कमिन्स १८ वर्ष व १९३ दिव सांचा होता
इंग्लंडकडून कसोटीत पदार्पणात पाच विकेट्स घेणारा ५३वा खेळाडू ठरला, नुकतेच विल जॅकने हा पराक्रम केलेला
१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडकडून त्याने ४ सामन्यांत १२ विकेट्स घेतलेल्या आणि तो दुसरा यशस्वी गोलंदाज ठरलेला.
रेहानचे वडील नसीम अहमद यांचा जन्म पाकिस्तानचा अन् ते माजी क्रिकेटपटू आहेत.. ते अष्टपैलू खेळाडू होते
त्यांनी इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. रेहानचे भावंड फरहान व रहीम हेही क्रिकेटपटू आहेत
रेहान हा इंग्लंडकडून कसोटीत पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू आहे.
क्लिक करा