सध्या आयपीएलचा थरार सुरू आहे. सध्या विराट कोहली या आयपीएल सीजनमधून किती कमाई करत असावा असा अनेकांना प्रश्न पडला असेल.
विराट कोहली या आयपीएल सीजनमधून किती कमाई करतोय? त्याला सॅलरीशिवाय आयपीएलमध्ये किती पैसे मिळणारेत? जाणून घेऊया.
विराट कोहलीची बेस सॅलरी २१ कोटी रुपये आहे. ही रक्कम केवळ टीमचा हिस्सा म्हणून मिळते.
प्रत्येक मॅचसाठी त्याला ७.५ लाख रुपये मिळतात. जर आरसीबी फायनलला पोहोचली तर १७ सामन्यांची ही रक्कम १.२५ कोटी होईल.
याशिवाय त्याला परफॉर्मन्स बोनसही मिळणार आहे. प्लऑफ क्वालिफाय केल्यास ५० लाख, अंतिम सामन्यात पोहोचल्यास ७५ लाख आणि तो जिंकल्यास १.५ कोटी असे एकूण २.७५ कोटी मिळतील.
याशिवाय ऑरेंज कॅपसाठी १५ लाख, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरसाठी २५ लाख म्हणजेच ४० लाखांचं वैयक्तिक अवॉर्डही यात आहे.
जर टीमला २० कोटी मिळाले तर ३० टक्के प्लेअर्सना मिळतात. कोहलीचा त्यात हिस्सा १५ टक्के म्हणजेच ९० लाख रुपये असेल.
सामन्यांदरम्यान आणि ब्रँड प्रमोशनमधून कोहलीची कमाई ५ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. या सीजनदरम्यान त्याची कमाई ३१-३२ कोटी असू शकते. म्हणजे प्रत्येक तासाला खेळण्यासाठी १८.५ लाखांपेक्षाही अधिक.