केस खूप गळत असतील, केसांची वाढ खुंटली असेल तर या काही वनस्पतींचा लेप केसांना लावून पाहा. केस भराभर वाढतील शिवाय केसांच्या इतर समस्याही कमी होतील.
यातलं सगळ्यात पहिलं आहे जास्वंद. जास्वंदाची पानं तसेच फुलं दोन्हीही केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
केसांसाठी कोरफडीचा गर खूप पोषक असतो. यामुळे केसांची छान वाढ तर होतेच, पण केस चमकदार आणि सिल्की होण्यासही मदत होते.
रोजमेरी देखील केसांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळेच केसांसाठी असणाऱ्या बऱ्याच तेलांमध्ये रोजमेरीचा वापर होतो. रोजमेरी तुम्हाला नर्सरीमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळू शकते.
सध्या आवळ्याचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे आवळ्याचा रस काढून केसांना लावा. यामुळे डोक्यातला कोंडा कमी होऊन केस गळणंही कमी होतं.
मेथ्यादेखील केसांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. मेथ्या रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी दही टाकून त्याचा लेप करून केसांच्या मुळाशी लावा. यामुळे केस छान वाढतील आणि दाट होतील.