शतकी खेळीसह हिरो ठरल्यावर पुढच्या मॅचमध्ये झिरो ठरलेले ९ फलंदाज
शतकी खेळीनंतर शून्यावर बाद होणारा संजू काही पहिला फलंदाज नाही, इथं पाहा संपूर्ण यादी
सलग दोन शतकी खेळीनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसनच्या पदरी भोपळा आला.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये शतकी खेळीनंतर शून्यावर बाद होणारा तो काही पहिला फलंदाज नाही. एक नजर अशी वेळ आलेल्या फलंदाजांवर...
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याच्यावरही शतकी खेळीनंतर झिरोवर आउट होण्याची वेळ आली होती. तो पहिला फलंदाज आहे जो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये शतकी खेळीनंतर शून्यावर बाद झाल्याचे पाहायला मिळाले.
न्यूझीलंडचा ब्रेन्डन मॅक्युलम याने २०१० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात ११६ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतरच्या दुसऱ्या सामन्यात तो झिरो ठरला होता.
न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रोचाही या यादीत समावेश आहे. शतकी खेळीनंतर दोन सामन्यात तो खातेही उघडू शकला नव्हता.
सर्बियन क्रिकेटर लेस्ली डनबार हा देखील या यादीत आहे. ज्याच्यावर शतकी खेळीनंतर शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली होती.
दक्षिण आफ्रिकेचा राइली रुसो दोन डावात शतकी खेळी केल्यावर भारताविरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता.
२०२२ मध्ये कॅनडाच्या ताफ्यातील एरॉन जॉनसन याने ओमान विरुद्ध १०९ धावांची खेळी करून लक्षवेधलं. दुसऱ्या सामन्यात त्याच्यावर शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली होती.
संजूशिवाय या यादीत भारतीय युवा स्टार यशस्वी जैस्वालचाही समावेश आहे. तोही शतकी खेळीनंतर शून्यावर बाद झाला होता.
इंग्लंडचा स्फोटक बॅटर आणि सलामीवीर फिल सॉल्ट याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात शतक झळकावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता.