... म्हणून SBI चा नफा ३५ टक्क्यांनी झाला कमी, कारण आलं समोर
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयनं आपला तिमाही निकाल जाहीर केला.
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयनं आपला तिमाही निकाल जाहीर केला. बँकेच्या नफ्यात ३५ टक्क्यांची घसरण झाल्याचं यातून समोर आलं. आता बँकेच्या चेअरमन यांनी याचं कारण सांगितलं आहे.
डिसेंबर तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा घसरुन ९१६४ कोटी रुपये झाला होता. यामध्ये घट का झाली याचं कारण आता समोर आलंय.
कर्मचाऱ्यांचं वेतन आणि पेन्शनधारकांचं पेन्शन वाढवल्यामुळे यात घट झाल्याचं एसबीआयचे चेअरमन दिनेश कुमार खारा यांनी सांगितलंय.
जर वेतन आणि पेन्शनसाठी एकरकमी तरतूद नसती तर बँकेचा निव्वळ नफा १६,२६४ कोटी रुपये झाला असता, अशी प्रतिक्रिया खारा यांनी दिली.
डिसेंबर तिमाहीमध्ये करण्यात आलेल्या ७१०० कोटींच्या तरतुदींपैकी ५४०० कोटी रुपये पेन्शनसाठी असल्याचं दिनेश कुमार खारा यांनी सांगितलं.