Tap to Read ➤
'सुवर्ण'संधी; तोळ्यामागे वाचतील ८०० रुपये
सोन्यात गुंतवणूक योजनेचा दुसरा टप्पा सुरू
सोन्यातील गुंतवणूक म्हणजे सगळ्यात भारी गुंतवणूक, असं समजणारा मोठा वर्ग आजही आहे.
कमकुवत जागतिक अर्थव्यवस्थेतही सोने हे चांगले रिटर्न देणारी गुंतवणूक असल्याचं तज्ज्ञांचंही म्हणणं आहे.
सोन्याची महती अन् जागतिक कीर्ती लक्षात घेऊन सरकार पुन्हा घेऊन आलं आहे, सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड.
एक ग्रॅम सोनं म्हणजेच एका गोल्ड बॉण्डची इश्यू प्राइस ५,९२३ रुपये ठरवण्यात आलीय.
एक तोळा सोनं ऑनलाइन खरेदी केल्यास ५०० रुपयांची सवलत दिली जाणार आहे.
राज्यातील १० ग्रॅम सोन्याचा भाव ५९,६०० रुपये आहे. मात्र, हे बॉण्ड ५८,७३० रुपयांत घेता येतील.
११ सप्टेंबरपासून १५ डिसेंबरपर्यंत सॉव्हरिन गोल्ड बॉण्डमध्ये पैसे गुंतवता येतील. ५ वर्षांनंतर या गुंतवणुकीतून बाहेर पडता येतं.
या गुंतवणुकीत इश्यू प्राइजवर दरवर्षी २.५ टक्के व्याज दिलं जातं. तसंच, RBI चा थेट संबंध असल्याने पैसे बुडण्याची भीती नसते.
गोल्ड बॉण्डमधील गुंतवणुकीच्या आधारे गरज भासल्यास बँकेतून कर्जही काढता येतं.
पोस्ट ऑफिसात ऑफलाइन पद्धतीनेही सोव्हरिन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करता येईल.
क्लिक करा