Tap to Read ➤
वाढत्या उन्हाळ्यात'अशी' घ्या काळजी, राहा सुपरकूल!
मार्चमध्ये एवढा उकाडा? अजून एप्रिल, मे कसा जाणार या विचाराने होऊ नका त्रस्त, दिलेले उपाय करून राहा सुपरकूल, मस्त!
ऋतुमान बदलले की शरीराच्या तपमानातही बदल घडू लागतात. हा समतोल साधता आला तर अजिबात त्रास होणार नाही, त्यासाठी दिलेले उपाय करा.
नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास कधीच होणार नाही. अनुलोम विलोम अधिक केल्याने शरीराचे तापमान स्थीर राहते.
उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्त वेळ सुरु ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.
शक्यतो उजव्या कुशीवर झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप मोकळी होईल.
हलका आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.
माठातील पाणी किंवा कोमट पाणी बसून सावकाश एक एक घोट करत प्या. बर्फाचे पाणी वा सरबत पिऊ नका.
उन्हातून आल्यावर गूळ पाणी घ्या. जवळ सतत खडीसाखर ठेवा.
लिंबू, कोकम सरबत तसेच जिरेपूड, सैंधव मीठ घालून ताक प्या, उष्णता वाढणार नाही.
दुपारच्या जेवणात पांढऱ्या कांद्याचा समावेश करा.
रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळा व बेंबीत दोन थेंब टाका. तसेच देशी गाईचे दोन थेम्ब तूप नाकात टाका.
उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.
क्लिक करा